🔶मूळ भाषेतील शब्द शोधा🔶
◾ प्रश्न १- ' प्रावृष' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ज्याचे मराठीतील बदललेले रूप 'पाऊस' आहे.
अ)मागधी
ब) पाली
क) शौरसेनी
ड)महाराष्ट्री
➡️ उत्तर:-ब -पाली
मराठीत शेकडा सत्तर टक्के शब्द संग्रह संस्कृतनिष्ठ असले तरी मराठी भाषानिर्मीतीसाठी अनेक प्राकृत व अपभ्रंश भाषांची देखील मदत झालेली आहे.एखाद्या शब्दाचे मूळ रूप संस्कृत असले तरी कालांतराने त्यामधे होत जाणारे स्वनलोप,स्वनरूपांतर,वर्णबदल,प्रयोगातील वेगळेपणा,वचनबदल तर उच्चारबदल इत्यादींमुळे ते रूप परिवर्तन होत होत पुढील भाषेत ते बदललेले रूपच तो शब्दच बनून जातात.'प्रावृट्'चे एक वचन प्रावृष आहे पण पुढे वर्णबदल होता होता पालीमधे प्रावृष रूढ झाले व कालांतराने त्याचे पाऊस झाले व मराठीत ते रूढ झाले.
◾ प्रश्न २- 'तहान'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे जो मराठीतही सहज वापरल्या जातो?
अ) प्राकृत
ब)अर्धमागधी
क)पैशाची
ड) पाली
➡️ उत्तर:-क-पैशाची
मराठीने पैशाची भाषेतील एक विशेष उचललेला आहे.तो म्हणजे पैशाचीत 'ण'कार नाही,'ण'साठी नेहमी 'न'चा वापर झालेला आहे.मराठीने 'ण'चा 'न'करण्याची प्रवृत्ती पैशाचीकडून घेतलेली आहे.त्यामुळे संस्कृतात आपल्याला तृष्णा दिसते तर पैशाचीमधे त्याचे 'तहान'मधे परिवर्तन झाले आहे जे मराठीने जसेच्या तसे घेतले.
◾ प्रश्न३- 'कुक्कुट' हा कोणत्या भाषाकूळातील शब्द आहे जो संस्कृतमधेही आढळतो?
अ)द्रविड
ब)इंडो-युरोपियन
क)आस्ट्रिक
ड)सेमेटिक
➡️ उत्तर:-अ-द्रविड
संस्कृतातही हा शब्द आढळतो.द्रविडकूळातून संस्कृतात साधारणतः एकहजारच्याही वरती शब्द आलेले आहेत.कुक्कुट हा द्रविडकूळातील शब्द आहे.
डाॅ.अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान.
मस्तच !!!
ReplyDeleteनेशन
ReplyDelete